साखरखेर्ङ्याच्या ठाणेदारांनी शेतकय्रांच्या बांधावर जावून जागच्या जागीचं वाद मिटविला

 साखरखेर्ङ्याच्या ठाणेदारांनी शेतकय्रांच्या बांधावर जावून जागच्या जागीचं वाद मिटविला 

ठाणेदार जितेंद्र आडोळे साहेब

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे

येत्या महिनाभरात मान्सूनचे आगमन होत आहे त्यामुळे पहिल्या पावसापूर्वी पेरणीपूर्व मशागतीची तयारी होत असताना बादांचे, शेतरस्त्याचे वाद चव्हाटय़ावर येणार आहे दरवर्षी पेरणीपूर्व अशा वादाचे पर्यावसान भांडणात होऊन शेतकऱ्यांना पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागतात सदर यातील अनेक वाद किरकोळ स्वरुपाचे असून वादाचे निवारण गांव पातळीवरच होते सदर वाद सोडविण्यासाठी शेतकऱ्यांच्या तक्रारींचा विचार करून त्या सोडविण्यासाठी त्याच गांवात प्रयत्न करू असा निर्णय ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केला आहे.

प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना ठाणेदार आडोळे म्हणाले की, बादांचे अनेक प्रकरणे न्यायालयात खितपत पडून आहेत. वादीसाठी म्हैस मारण्याचा हा प्रकार लक्षात घेता, न्यायप्रविष्ट किरकोळ कारणावरून दाखल असलेल्या प्रकरणात शेतकऱ्यांची आर्थिक गोची झाली आहे. दरवर्षी पेरणीपूर्व अशा किरकोळ तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येत असताना शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी गांव पातळीवर पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांना विश्वासात घेऊन सदर भांडणाचे मूळ शोधून त्या त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत असे सांगून आडोळे म्हणाले कि, सदर काम हे महसूल विभागाचे असले तरी प्राथमिक तक्रार ही पोलीस ठाण्यातच शेतकरी घेऊन येतात यामध्ये त्यांचा वेळ पैसा खर्च होतेच शिवाय गावात सौहार्दाचे वातावरण दुषित होण्यास वेळ लागत नाही यातून एकमेकांत वैरभाव निर्माण होतो. अशा भांडणातून खूनही झाल्याच्या घटना या भागात घडल्या आहेत त्यामुळे सदर वाद टाळण्यासाठी महसूल विभाग आणि गावपातळीवरील सबंधित लोकांना सोबत घेऊन हे वाद आपण मिटवून शेतकऱ्यांत समेट घडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत याला नक्कीच यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


बांदाच्या वा शेतरस्त्याच्या वादाला फाटा देण्यासाठी शेतकऱ्यांत आपसी समझोता करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण थेट त्या त्या गांवात जात आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करीत आहे असे मत साखरखेर्ङा पोलीस स्टेशनचे

ठाणेदार जितेंद्र आडोळे

साहेबांनी आपले मत व्यक्त केले आहे तसेच याआधी सुद्या जागदरी येथील शेतकय्राला जागच्या जागीचं न्याय मिळवून दिला आहे.तसेच आडोळे साहेबांच्या या निर्णयाचे बुलडाणा जिल्यात सर्वञ शेतकरी बांधावांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे तसेच सर्वच शेतकरी बंधुनी ठाणेदार आडोळे साहेबांचे आभार व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler