साखरखेर्ङ्यातील नागरीक व व्यापारी यांनी टाळेबंदीला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्धल पोलीसांनी मानले सहृदय आभार-साखरखेर्ङा पोलीस

 साखरखेर्ङ्यातील नागरीक व व्यापारी यांनी टाळेबंदीला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्धल

  पोलीसांनी मानले सहृदय आभार-साखरखेर्ङा पोलीस

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे

"खुश्क दरियाओं में हलकिसी रवानी और है

रेत के निचे थोडासा पाणी और है

बोरिएपर बैठियें कुल्हड में पाणी पीजिए

हम कलंदर है, हमारी मेजवानी और है "या राहत इंदौरी यांच्या ओळींना आचरणात आणत 

आम्ही तुमच्या साठीच बाहेर आहोत , तुम्ही घरातच बसा

असा संदेश देत टाळेबंदीत पोलीसांनी रस्त्यावर करोनाशी झुंज दिली ठिकठिकाणी करोनाच्या दुसऱ्या लाटेत जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीत पोलीसांकडून हकनाक घराबाहेर पडणाऱ्यांची बॉडी मसाज झाली तर काही ठिकाणी पोलीसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेकांनी स्वत:स, कुटुंबास गृहवासात कोंडून घेतले. घरात येणाऱ्या दुधाच्या पिशव्याही साबणाच्या पाण्याने धुऊन घेतल्या. दुसऱी लाट जेव्हढ्या वेगाने पसरली तेवढ्याच वेगाने ती कमी झाली याचे श्रेय खरे तर पोलीसांना जाते नागरिकांनी पोलीसांचे आभार मानण्याऐवजी पोलिसांनीच जनतेला साष्टांग दंडवत करीत कृतज्ञतापूर्वक आभार मानत आपल्या माणूसकीचा प्रत्यय आणून दिला आहे. 

कोविड-१९ चा प्रादुर्भाव देशात सुरू झाल्यानंतर त्याच्या निराकरणाच्या लढय़ात सर्वाधिक जोखीम उठवावी लागते ती आरोग्यसेवा, पोलीस सेवा, सफाई व्यवस्था, पुरवठा सेवा पुरवणाऱ्यांना. त्यातही करोनासारख्या संसर्गजन्य विषाणूच्या बाबतीत डॉक्टर आणि आरोग्यसेवकांच्या जीविताला धोका सर्वाधिक. साथरोग नियंत्रण कायद्याच्या कार्यकक्षेतील हा विषय असल्यामुळे विलगीकरण, टाळेबंदी, संचारबंदी, जमावबंदी अशा उपायांच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस यंत्रणेवरच. त्यामुळे पोलिसांमध्येही संसर्गाचा धोका मोठय़ा प्रमाणात उद्भवतो. साखरखेर्डा पोलीस ठाण्यात याच टाळेबंदीत 25 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर लढाईतील साखरखेर्डा पोलीस ठाण्यातला ठाणेदारांच्या गाडीचा चालक पहिला पोलीस हुतात्मा ठरला.मात्र तरीही मोठी उमेद उराशी बाळगून ‘तू चाल पुढं तुला रं गडय़ा भीती कशाची’ या ध्येयाने ठाणेदार जितेंद्र आडोळेसह संपुर्ण कर्मचारी अहोरात्र खडा पहारा देत आहेत सद्य:स्थितीत करोना साथीचा प्रसार वाईटाकडून अतिवाईटाकडे सुरू आहे, उघडे डोळे आणि चालणारे डोके असलेला कोणताही सामान्य बुद्धिमत्तेचा इसम आसपासच्या घटना पाहून करोनाची अवस्था काय हे सहज सांगेल. मागे थाळ्या वाजवल्या, दिवे लावले, शंखनाद केले आणि या वातावरणनिर्मितीतून सहज पसरलेल्या भीतीमुळे फक्त वेडाचाराच्या लाटा उसळल्या 

दरम्यान पोलीसांनी टाळेबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करताना संवेदनशील गांवात टाळेबंदीचे नियम पायदळी तुडविणाऱ्यांना काबूत आणले त्यातल्या त्यात जाणीव जागृती निर्माण करून नागरिकांना भयमुक्तही केले. साखरखेर्डा परिसरात कोविड सेंटर नसल्याने आरोग्य यंत्रणेवर लसीकरण, करोना तपासणी यापेक्षा दुसरे काम नाही स्थानिक प्रशासकीय यंत्रणा ग्रामसेवकांच्या गैरहजेरीने काही वेळा दुबळी ठरली तर आपल्या अधिकाऱ्यांच्या नजरेत बडेजाव मिरविण्यासाठी महसूल यंत्रणा कठोर डिवटी ऐवजी फोटोसेशन पुरतीच मर्यादीत होती त्यामुळे सगळा ताण अक्षरशः पोलीसांवरच आला. टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक मुस्लिम दाम्पत्य मुलीच्या लग्नासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी आल्यावर ठाणेदाराने पतीला दंडुक्याचा प्रसाद दिला घरी गेल्यावर पश्चातापदग्ध झालेल्या ठाणेदाराला जेव्हा खरोखर मुलींच्या लग्नसाहित्य खरेदीसाठी आलेल्या एका बापाचा त्याच्या पत्नीसमोर अपमान केल्याचं कळल्यावर ठाणेदाराने सहानुभूती दाखवून अडोतीसशे रूपयांचे सामान त्या वधूपित्याला खरेदी करून दिले. "जनतेंनी ब्रेक द चेन" चे महत्त्व पटवून सांगताना दुसऱ्या टप्प्यातील टाळेबंदी यशस्वी झाल्याने 90 टक्के रिकव्हरी झाली यातून जनतेच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे मात्र याच काळात आमच्या कडून चुका झाल्या असतील तर त्या पदरात घेवून यापुढे असेच पोलीसांप्रती ऋण कायम ठेवा असे आवाहन करतानाच पोलीसांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बीटमध्ये होर्डिंग्ज च्या माध्यमातून आभार प्रकट केले आहे. पोलीसांनी मानलेल्या भावगर्भ आभाराने होर्डिंग्ज वाचताना नागरिकांचे डोळे डबडबले आहे. 




तिसरी लाट कदाचित येणारही नाही किंवा आली तर ती एवढी मोठी असेल असंही नाही; पण अशा भाकितांमुळे भीती निर्माण झाली आहे मुळात हे सगळे अंदाज आहेत, ते खरे ठरतीलच असं नाही हे आपल्याला लोकांना खूप समजावून सांगण्याची गरज जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखालीआम्हाला उत्साहाने परिसरातील संसर्गजन्य रुग्णांचा आकडा काबूत आणता आला याचे समाधान आहे यात पोलीसांना सहकार्य करणाऱ्या नागरीकांचे

आभार मानलेच पाहिजे.असे मत साखरखेर्ङ्याचे

-ठाणेदार जितेंद्र आडोळे साहेब यांनी मत व्यक्त केले आहे.



नागरिकांनी पोलीसांना या टाळेबंदीत कमालीचे सहकार्य केले आहे डिवटी ही आमची जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही आभाराची वाट न बघता जनतेचे आभार मानतो कारण राष्ट्रीय एकात्मतेच्या वाटेने मार्गक्रमण करताना शेवटी जनतेचे सहकार्य आम्हाला नवी उर्जा देते असे मत

-अरविंद चावरिया

जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी व्यक्त केले आहे तसेच साखरखेर्ङ्यातील नागरिक आणि व्यापारी व ठाणेदार जितेंद्र आडोळे साहेबांचे सुद्धा या अप्रतिम कार्याचे बुलडाणा जिल्यात सर्वञ कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler