चिमूर तालुका काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी संजयभाऊ घुटके यांची नियुक्ती
प्रतिनीधी_ प्रविण वाघे नेरी
मो, 7038115037
नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी येथील रहिवासी संजयभाऊ घुटके यांची चिमूर तालुका काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी सदर नियुक्तीचे पत्र चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीला 4 जून रोजी पाठविले आहे, नियुक्तीपत्र : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी
सामाजिक क्षेत्रात संजय घुटके यांचा दांडगा अनुभव आहे. याआधी त्यांनी बहुजन समाज पक्षात वीस वर्षापेक्षा अधिक काळ कार्य केले. कॅडरबेस कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. बहुजन समाज पार्टीतर्फे त्यांनी 1999 मध्ये चिमूर विधानसभा निवडणुकासुद्धा लढवली होती. बी. एस. पी. मधून त्यांनी काँग्रेस पक्षात साडेचार वर्षांपूर्वी प्रवेश केला होता.काँग्रेसने संजय घुटके यांचा अनुभव व जनसंपर्क लक्षात घेऊन आधी त्यांच्यावर चिमूर तालुका संघटन सचिव पदाची व आता चिमूर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे.
पक्ष संघटन मजबूत करणे, काँग्रेस पक्षात राहून गोरगरिबांची कामे करणे, जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पार्टी मजबूत करणे, या कामात मी स्वतः ला झोकून देणार असल्याची प्रतिक्रिया अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संजय घुटके यांनी व्यक्त केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार वरिष्ठांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष / उपाध्यक्ष यांना एका पत्राद्वारे संजय घुटके यांची चिमुर तालुका काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे कळविले. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुका काँग्रेस कमेटीकडून व हितचिंतकांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे:

