*चिखली तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांचे बेमुदत संप*

 चिखली तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांचे बेमुदत संप



बुलडाणा:- चिखली तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांचा दि.15 जुन पासुन बेमुदत संप सुरु करु महाराष्टाचे मुख्यमंत्री यांना तहसिलदार गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमुद शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे, करुणा बाधित औषधी गोळ्या व एक बेड त्यांचा असावा व मृत्यू पावले तर 50 लाखाचा विमा अशा लोकांना मिळावा आरोग्य विभागाच्या जर जागा निघाल्या तर त्यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांचा सहभाग असावा

आशांना अठरा हजार रुपये व गट प्रवर्तक  21000 वेतन श्रेणी लागू करावी व पेन्शन योजना सुरू करावी व कामाचा अतिरिक्त बोजा देण्याआधी यांना मानधन किती मिळेल याचा विचार करावा 8 ते 12 घंटे वेठबिगार सारखे काम करून घेऊन सुद्धा योग्य मोबदला नाही मिळाला त्यामुळे संतप्त आशा व गटप्रवर्तक यांनी बेमुदत संप करीत आहे तरी शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आशा व गटप्रवर्तक यांच्या समस्या सोडाव्यात असे निवेदनात म्हटले आहे यावेळी पंचायत समिती सभापती सौ सिंधुताई तायडे यांना निवेदन देऊन संपाबाबत माहिती दिली व त्यांनी तुमच्या समस्या सोडवू याबद्दल आश्वासन दिले व चिखलीचे माननीय आमदार सौ  श्वेता ताई महाले यांनीसुद्धा फोनद्वारे पाठींबा दिला तसेच समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन सरकार दरबारी आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू व आशा व गटप्रवर्तक यांच्यामागे आमचा पाठिंबा दर्शविला आहे या संपाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव गायकवाड सर व गटप्रवर्तक अलका राजपूत प्रतिभा थिगळे गीता येवले गीता बचाटे सुनिता चव्हाण व आशा स्वयंसेविका  गोदावरी मुरकुटे सपकाळ उषा सावळे जयश्री भगत लता कांबळे गोदावरी भगत प्रमोदिनी वळसे प्रिया बोराडे यांच्यासह तालुक्यातिल सर्व आशा व गटप्रवर्तक इत्यादीनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler