रस्त्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करा : छोटू कांबळे

 रस्त्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करा : छोटू कांबळे



अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलन छेडणार


विशाल गवई 

तालुका प्रतिनिधी चिखली 7083304124

    चिखली :- येथील प्रभाग 05 संत रविदास नगर मधील मातंगपुरा भागातील रखडलेले रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी छोटू कांबळे यांनी  दि. 22 जून रोजी मुख्यधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की' संत रविदास नगरमधील मातंग पुरा भागामध्ये गेल्या 30 वर्षांपासून रस्ते, नाले ,घरकुल इतर कुठल्याच नागरी सोयीसुविधा अद्याप मिळाल्या नाहीत. रस्ता व नाले नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी रस्ता  ,नाले ,घरकुल सह नागरी सोयीसुविधा देण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र संबंधित ठेकेदार यांनी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हा रास्ता खोदून त्या वर मातीमिश्रित मुरूम टाकून सदर रस्ता कामाला सुरुवात केली. मात्र  वॉर्डातील एका सो-कोल्ड नेत्याने कमिशनसाठी रस्ताचे काम थांबवून ठेवल्याचा आरोप छोटू कांबळे यांनी निवेदनात केला आहे. तसेच पावसाळ्यात रखडलेल्या या कामामुळे स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी रखडलेले रस्ता बांधकाम तात्काळ येत्या 8 दिवसात सुरू करण्यात यावे.अर्धवट रस्ता बांधकामाने नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास संबंधित ठेकेदार व नगर पालिका प्रशासन या परिस्थितीला जबाबदार राहील.येत्या 8 दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास लोकशाही  मार्गाने आंदोलन छेडू असा इशारा छोटू कांबळे यांनी मुख्यधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler