प्रहार संघटना धावली शेतकर्याच्या मदतीला
प्रहार सेवक किशोर डुकरे यांच्या प्रयत्नाने दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचले टान्सफार्म.
चिमुर ता.प्रतिनीधी:-प्रविण वाघे
सहा महिन्यापासून प्रलंबीत प्रश्न एकाच झटक्यात सुटला
प्रतिनिधी :- प्रविण वाघे:मो, 7038115037
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा सच्चा कार्यकर्ता किशोर डुकरे यांच्या कामाचा झंझावात हा खरोखरच एखाद्या परिपक्व नेत्याला लाजवेल असाच आहे, कारण ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्या याचे परिपूर्ण ज्ञान असलेले प्रहार सेवक किशोर डुकरे हे प्रशासनाशी ग्रामीण जनतेच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झगडतात त्यामुळे त्यांच्या आक्रमक शैलीमुळे त्यांचे काम लवकर होते अशाच एका प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली असून मागील सहा महिन्यापासून प्रलंबित प्रश्नाला त्यांनी एका दिवसात सोडवले आहे.
चिमूर तालुक्यातील सावरी (बी ) येथील शेतकऱ्याने दि 23/6/2021ला सकाळी किशोर डुकरे यांना फोन केला की भाऊ माझ्या शेतातील डीपी सहा महिन्या पासून बंद आहे तर तुम्ही आज महावितरण कार्यालयात येता काय, त्यावर लगेच होकार देऊन ते कार्यलयात गेले अधिकारी याना विचार पूस केली कि त्या डीपी वर तीन शेतकरी आहे त्या पैकी दोन शेतकऱ्यांनी बिल भरले मग तुम्हाला डीपी द्यायला उशीर काय? त्यांना ऑफीशियल कारण सांगण्यात आले परंतु त्यांनी ते मानले नाही त्यामुळे प्रहार सेवक किशोर डुकरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन बच्चू कडू स्टाईल अधिकाऱ्याला ठणकावून सांगितले की मला उद्या ज्या उद्या डीपी पाहिजे अन्यथा …आणि काय आश्चर्य दुसऱ्याच दिवशी त्या शेतकऱ्यांच्या शेतात डी पी बसविण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले असून किशोर डुकरे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
