महावितरणच्या निष्काळजी पणा मुळे तीन वर्षीय मुलाचा मृत्यू
उमरेड तालुका प्रतिनिधी
आशू लामसोगे 8855034555
आज दी.24/06/2021 रोजी सिर्सी येथील नैतिक पुजाराम बावणे वय 3 वर्ष याचा खुल्या डीपी च्या जिवंत तारेशी सम्पर्क येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.
नैतिक हा आपल्या आजी सोबत बाजाराकडे आला होता तेव्हड्यात त्याला शौचालयाला जायचे होते म्हणून तो त्या डिपीच्या जवळ काही अंतरावर जाऊन बसला तेव्हड्यात त्याची आजी पाणी आनन्या करीता गेली असता तो उठून डिपीच्या जवळ जाऊन खुल्या तारास त्याच्या हाताचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
महत्वाचे म्हणजे ही डिपी येथील आठवडी बाजारात आहे या आधी सुद्धा डिपी स्थलांतरीत करण्याकरिता MSEB ला वारंवार स्थानिकांकडून सांगण्यात आले असे असून डीपीला झाकनही नाही आहे
या समस्येकडे नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही MSEB ने दुर्लक्ष केले असे स्थानिकांचे म्हणणे आहे.