संत रविदास सभागृह वणी येथे राजश्री शाहू महाराज जयंतनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न...

 संत रविदास सभागृह वणी येथे राजश्री शाहू महाराज जयंतनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न...

 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी.

 अमोल बांगडे. 

वणी: संत रविदास महाराज युवा मंच,वणी व राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरक्षणाचे प्रणेते छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे (वणी विभागीय) अध्यक्ष रवी धुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

  आपल्या संस्थानात मागासलेल्या समाजासाठी आरक्षण लागू करणारे,बहुजन हिताय,बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य सत्यात उरविनारे बहुजनांचे कैवारी,आरक्षणाचे प्रणेते राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरातील संत रविदास महाराज सभागृहात चर्मकार बांधवांतर्फे अभिवादन कार्यक्रम कोविड-१९ रोग प्रतिबंधक नियमांचे पालन करून संपन्न झाला.

यावेळी विभागीय  अध्यक्ष रवी धुळे व सदस्य किशन कोरडे यांनी अभिवादनपर विचार व्यक्त केले.

   या कार्यक्रमाला राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा यवतमाळ चे युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे,किशोर हांडे,पंकज वादेकर,श्याम गिरडकर आदी समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler