पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अघोषित आणीबाणी विरोधात काळे झेंडे दाखवून काँग्रेसचे ब्रम्हपुरी येथे जन आंदोलन

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अघोषित आणीबाणी विरोधात काळे झेंडे दाखवून काँग्रेसचे ब्रम्हपुरी येथे जन आंदोलन

ब्रम्हपुरी/ता.प्र

मनोज अगडे :-9765874115

त्यामुळे केंद्र सरकारच्या ओबीसी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अघोषित आणीबाणीच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीदिनी ब्रम्हपुरी शहरातील शिवाजी महाराज चौकात काळे झेंडे दाखवून जन आंदोलन उभारण्यात आले.

व संविधान रक्षणाची शप्पथ सुध्दा यावेळी घेण्यात आली.


 यावेळी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, अँड गोविंदराव भेंडारकर, पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, न.प. गटनेता विलास विखार, नगरसेवक महेश भर्रे, जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, नगराध्यक्षा रिताताई उराडे, नगरसेविका सुनिताताई तिडके, नगरसेविका सरीताताई पारधी, नगरसेविका लताताई ठाकूर, नगरसेविका वनिताताई अलगदेवे, नगरसेविका निलीमाताई सावरकर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा मंगलाताई लोणबले, महिला काँग्रेस शहराध्यक्षा योगीताताई आमले, अण्णाजी ठाकरे, सुरेश दर्वे, चिमुर विधानसभा ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष काशिनाथ खरकाटे, गुड्डु बगमारे, नानाजी तुपट, जगदीश तलमले, उमेश धोटे, दिवाकर मातेरे, सुरेश ठिकरे, ईश्वर ठाकरे, वामन मिसार, नेताजी मेश्राम, नारायण मेश्राम, टिकले सर, वकार खान,गणवीर सर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश बानबले, सोमेश्वर उपासे, शिवाजी नखाते, राजेश तलमले यांसह बहुसंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler