*आज सभेमध्ये ताडोबा मधील DD यांनी खालील दिलेल्या पुढील सूचना*
प्रतिनीधी:-प्रविण वाघे, मो, 7038115037
1) सोमवार दिनांक 28/06/2021 पासून बफर क्षेत्रातील पर्यटन Offline पद्धतीने चालू होईल
2) त्यापूर्वी उद्या शनिवार व परवा रविवारला सर्व गाईड जिप्सी चालक-मालक यांचेकडून ज्या ज्या ठिकाणी रोड खराब झाले असतील ते दुरुस्त करून घ्यायचे आहे त्याकरिता संबंधित बीटवनरक्षक यांनी स्वतः हजर राहून रोड दुरुस्त करून घेणे
3) जे रोड दुरुस्त होणे शक्य नाही ते रोड बॅरियर टाकून बंद करून घेणे
4) गाईड व जिप्सी चालक मोबाईल वापरू शकतील परंतु ते त्याचा गैरवापर करणार नाही
5) पर्यटकांना मोबाईल वापरता येणार नाही
6) प्रत्येक गाईड जिप्सी ड्रायव्हर व पर्यटकांना मास्क व स्यानीटायझर वापरूनच प्रवेश मिळेल 7) प्रत्येकांची थर्मल स्कॅनिंग करणे गरजेचे राहील
8) प्रवेश शुल्क 1000/- जिप्सी शुल्क 2200/- व गाईड शुल्क 350/- रुपये राहील
9) सर्व रक्कम रोख स्वरूपात घ्यावी लागेल.
10) गाईड व जिप्सी शुल्क सफारी संपल्यावर तेव्हाच त्यांना देणे आहे 11) प्रवेश फी शुल्क महिना संपल्यावर गेट व्यवस्थापकाने फाउंडेशनच्या खात्यात जमा करणे आहे
12) कोणीही नियमांचे उल्लंघन केले तर त्यांना 3 महिन्याकरता बंद करण्यात येईल
13) गेट व्यवस्थापकांनी गेट सभोवतालचा परिसर सुशोभीकरण करणे व स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे
14) जिप्सी मालकांनी त्यांच्या जिप्सी दुरुस्त करून घेणे जिप्सी खराब झाली किंवा जिप्सीचा फोरव्हील खराब असेल तर ती जिप्सी पर्यटनाकरिता वापरण्यात येणार नाही
