कोसरसार ग्रामपंचायत ला निधी उपलब्ध करुन देण्यात यावे यासाठी प्रहार सेवक यांनी अतिरिक्त मुख्ख कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन
वरोरा प्रतिनीधी:-ताराचंद मोहुर्ले, मो, 9657401979
वरोरा तालुक्यातील कोसरसार ग्रा.पं.गावाच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्याने कोसरसार हे गाव विकासापासून दूर जात आहे ,गाव विकासाच्या पायरिवर आणण्या करिता सरपंच व उपसरपंच यांनी गावातील काही प्रमुख मागण्या घेऊन १)गावातील मुख्य प्रो मंजूर करण्यात यावे
२) मौजा कोसरसार येथे व्यायाम शाळा मिळण्या यावें
३)लाभणसराड धरण ते नदी पर्यत अंदाज ३ ते ४कि.मी.लांब आहे त्या नालाला पुर येतो त्या पुरात हजारो एकर जमिन पुलाखाली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना पुरबुडाई मुळे कोणतही उत्पादन होत नाही त्यामुळे नाला खोलीकरण व रुंदीकरण यावें या प्रमुख मागण्या सह प्रहार सेवक यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक शेरखान पठान कोसरसार येथिल सरपंच गणेश मडावी व उपसरपंच अमित बाहादूरे व प्रहार सेवक गणेश उराडे उपस्थित होते
