सिंदखेडराजा सह चिखली,मेहकर तालुक्यात ढगफुटींचा पाऊस

 सिंदखेडराजा सह चिखली,मेहकर तालुक्यात ढगफुटींचा पाऊस

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा। समाधान बंगाळे



बुलडाणा जिल्यातील सिंदखेडराजा,चिखली,मेहकर तालुक्यातील तब्बल दोन तास ढगफुटीचा पाऊस दि.28जुनला सांयकाळी 5 च्या दरम्यान झाला.या पावसामुळे चिखली तालुक्यातील आमखेड गावचे धरण फुटल्यामुळे अंबाशी,गांगलगाव,तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद,मोहाडी,रताळी,शिंदी,साखरखेर्डा आणि मेहकर तालुक्यातील चायगाव,गजरखेड,या गावात अतीर्वूष्टी झाल्यामुळे शेतकय्रांच्या शेकडो एक्कर जमीनी पुर्णपणे खरडुन गेल्या.ढगफुटीमुळे 250 शेतकय्रांचे अतोनात नुकसान झाले आहे.कोराडी आणि भोगावती नदीला पुर आल्यामुळे  चार गावांचा संपर्क तुटला त्यामुळे लव्हाळा ते साखरखेर्डा या गावाला जोडणाय्रा पुलावरून पाणी आल्यान वाहतुक टप्प झाली.आमखेडचे धरण फुटल्यामुळे  सवडद गावामधील सर्व शेतकय्रांचे पिके वाहून गेले.तसेच आमखेड धरण फुटल्यामुळे लव्हाळा साखरखेर्ङा मार्गावरील सुद्धा वाहतुक टप्प करण्यात आली.साखरखेर्डा परिसरात मुसळदार पाऊस  झाला असुन नागरिकांनी या मार्गावर येवू नये असे आव्हाहन महसुल विभागाने केले.दुबार पेरणी साठी प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतकय्रांच्या पिकाचे  पंचनामे व आर्थिक भरीव मदत मिळावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler