ढग फुटी पावसामुळे शिंदी येथील शेतकय्रांची विहीर गेली वाहून
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा। समाधान बंगाळे
स्थानिक शिंदी येथील अल्पभुधारक शेतकरी मारोती बेलोडे यांची दि 28 जुन 2021 रोजी सांयकाळी 5च्या दरम्यान झालेल्या ढग फुटी पावसाने विहीर पुर्णपणे वाहून गेली.त्यामुळे शेतजमिनीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या अतिर्वूष्टीमुळे शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे.मारोती बेलोडे हा अत्यंत गरीब अल्पभुधारक शेतकरी आहे तसेच या शेतकय्राने कर्ज काढुन विहीर खोदली होती. विहीरीच्या माध्यमातून आपला ऊदरनिर्वाह भागवित असे.पण निसर्गाच्या वादळामुळे काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.तब्बल दोन तास ढग फुटीचा पाऊस झाला आणि मारोती बेलोडे या शेतकय्रांच्या नावावर असलेली क्षेञफळातील विहीर ही पुर्णपणे पाण्याने खचुन गेली अणि मुसळदार पावसाने पुर्णपणे विहीरीची आणि पिकांचीअतोनात नासाडी केली आहे.पुढील शेतीचे कामे करण्यासाठी आता शेतकय्रांनी जगावं की मरावं अशा भावना शेतकरी मारोती बेलोडे यांनी व्यक्त केल्या आहे.प्रशासनाने तातडीने शेतकय्रांच्या प्रकरणाची दखल घेवून महसुल विभाग सिंदखेडराजा यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात यावे व नविन विहीरी बांधण्यासाठी भरीव आर्थिक मदत करण्यात यावी अशी शिंदी येथील शेतकरी मारोती बेलोडे यांनी प्रशासनाला मागणी केली आहे.
