रब्बी पीक नुकसानीची भरपाई तात्काळ द्या जिल्हा परिषद सदस्य शिंपणे यांची मागणी

 रब्बी पीक नुकसानीची भरपाई तात्काळ द्या

जिल्हा परिषद सदस्य शिंपणे यांची मागणी

____________________________


 तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा।समाधान बंगाळे



देऊळगाव राजा,ता.२८ ः मागील वर्षी खरीप हंगामातील पिक विमा तसेच रब्बी हंगामात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानी बाबत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा परिषद सदस्य शीलाताई धनशिराम शिंपणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे

तालुक्यात उशिरा का होईना पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस झाला असून खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही मागील वर्षी खरीप हंगामात ऐन पिके बहरली असतांना अवकाळी पावसामुळे सोयाबीन,हरभरा,ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन झाले नाही तर यंदा रब्बी हंगामात ही पावसाने लहरीपणा दाखवत मोसमात असलेले पीक हिरावून घेतले मागील वर्षी चे खरीप व यंदा रब्बी हंगामात निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याने चालू हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही असे असताना बँकांमार्फत पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ होत आहे अशा संकटाच्या काळात शासनाने रब्बी पिकाच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी ची भरपाई तात्काळ दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे तसेच प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात जिल्हा परिषद सदस्य शिलाताई शिंपणे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तसेच मागील वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानी संदर्भात पिक विमा तात्काळ द्यावा अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler