ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे दलित वस्तीच्या रोडवर केले अतिक्रमण.
____________________________तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा।समाधान बंगाळे
देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेडा येथील ग्रामपंचायत च्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनेचे काम झालेल आहे. आणि आता ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे रोडवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याची माहिती ग्रामपंचायतला देऊनही सुद्धाग्रामपंचायत ने व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल गावकऱ्यांची घेतलेली नाही. अतिक्रमणाची तक्रार ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी यांना वेळोवेळी देऊ न सुद्धा ग्राम विकास अधिकारी( तिडके) यांच्याशी गावकऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता यांनी गावकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली व आज येतो उद्या येतो असे उत्तर गावकऱ्यांना दिले.
निमखेडा ग्रामपंचायत हद्दीत दोन ठिकाणी.एक दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत झाले रस्त्यावर एकाने व मंदिर परिसरात एकाने अशा दोन ठिकाणी अतिक्रमण झाले आहे अशी तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.