धक्कादायक :- शेतकरी अमोल देवतळे यांची फाशी घेऊन आत्महत्त्या.
वरोरा तालुक्यातील घटना
स्वताच्याच शेतात आंब्याच्या झाडाला लटकून फाशी.
प्रतिनिधी प्रविण वाघे :- 7038115037
________________
वरोरा तालुक्यातून जवळपास 15 किलोमीटर दूर असलेल्या बोरगाव देशपांडे येथे अमोल देवतळे वय 33 वर्ष या शेतकऱ्यांनी स्वताच्या शेतात जावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 3 च्या दरम्यान घडली.
अमोल देवतळे या शेतकऱ्यांनी काय म्हणून फाशी घेतली याचे कारण अजून गूलदस्त्यात असून त्याचे मागे पत्नी आई दोन मुले असा आप्त परिवार आहे. फाशी घेतल्यानंतर गावातील काही व्यक्तींना ही माहिती मिळताच शेतात धाव घेतली या संदर्भात शेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी चौकशीकरिता घटनास्थळी पोलीस चमू पाठवली असून पोलीस तपास सुरू आहे