गडचांदुर_ ब्रेकिंग न्यूज:- एका सोळा वर्षीय मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या

 गडचांदुर_ ब्रेकिंग न्यूज:- एका सोळा वर्षीय मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या.

आत्महत्त्येचे कारण अजूनही गूलदस्त्यात. पोलिसांचा तपास सुरू.

 प्रतिनिधी :-प्रविण वाघे मो, 7068115037

आज दुपारच्या सुमारास राजुरा लगताच्या टेम्बुरवाही गावात दिपाली बापूजी मापे नामक 16 वर्षीय मुलीने उद्धव लचमा कुड़संगे (आजोबा) याचे राहते घरी स्पोर्च च्या व्हरांडयात पाळण्याच्या दोरीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे सर्व परिवार शेतकामा करिता शेतात गेले होते.दरम्यान आत्महत्या केल्यानंतर गावकऱ्याना प्रेत दिसताच त्यांनी त्याच्या परिवाराला माहिती दिली.परिवारातील सदस्य घरी पोहचले असता त्यांनी गावातील पोलीस पाटीलास सांगितले आणि त्यांनी विरुर पोलीस स्टेशन ला माहिती दिली असता लगेच विरूर पुलिस स्टेशन ठाणेदार श्रीकृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात मौका पंचनाम्या करिता पो.हवा वागदरकर, मपोशी सौजण्या, पोशी मडावी, सैनिक धनपालसिंग वाधावन पोहचून पंचनामा करण्यात आला व मृतकाच्या प्रेताला उपजिल्हा रुग्णालय राजुरा करिता येथे उत्तररीय तपासणी करिता पाठविन्यात आले मात्र आत्महत्तेचे कारण अजूनही गूलदस्त्यात असून पोलीस तपास करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler