अस्वलीच्या हल्ल्यातील जखमीला कांग्रेसने दिला आधार:

 अस्वलीच्या हल्ल्यातील जखमीला कांग्रेसने दिला आधार:


प्रतिनिधी:-प्रविण वाघे, मो, 7038115037

मुल- मुल तालुक्यातील मौजा केळझर येथील वनविभाग वनविकास महामंडळच्या 434 कंपार्टमेंट झोनमध्ये केळझर येथील अतिशय गरीब असलेला श्रावण फकिरा मराठे वय (65) हा आपली बकरी चराईसाठी नेले असता जंगलातील झुडपामध्ये असलेल्या अस्वलाने श्रावण फकिरा मराठे यांचेवर हल्लाकरून गंभीर जखमी केले आहे ही घटना मागील दहा दिवसापूर्वी घडली असून बिचारा श्रावण मराठे दवाखान्यामध्ये अजूनही उपचार घेत आहे. श्रावण मराठे यांची परिस्थिती हलाकीची असून अठरा विश्व दारिद्र्य सहन करुन आपला संसार जोपासत आहे. ज्या तारखेला घटना घडली त्यावेळेस वनविकास महामंळाचे अधिकारी प्रत्यक्ष चौकशी करुन शासनाकडून जीकाही मदत मिळवून देता येईल असे प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र सुद्धा अत्यावश्यक असल्याची मागणी देखील गावकऱ्यांनी केली असल्याचे समजले. परंतु शासनाकडून मदत मिळण्याला वेळ असल्याने केळझर येथील युवक आदर्श रायपुरे व ग्राम पांच्यायतीचे उपसरपंच गुरुदास मराठे यांनी गंभीर जखमीला काही मदत मिळवून देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांची मुल येथे कांग्रेस भावनामध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन श्रावण मराठे यांना काही मदत करता येईल काय असे सांगताच संतोषसिंह रावत यांनी त्याच वेळेस आर्थिक मदत केली. यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भेजगाव येथील सरपंच अखिल गांगरेड्डीवार, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार उपस्थित होते. रावत यांनी केलेली मदत आदर्श रायपुरे व गुरुदास मराठे यांनी प्रत्यक्ष श्रावण मराठे यांच्या घरी नेऊन दिली असून संतोषसिंह रावत व कांग्रेस पदाधिकारी यांचेप्रति ग्रामस्थांनी आभार मानले,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler