ब-याच दिवसांपासुन आपल्या सर्वांच्या मनामध्ये कोरोनाने गस्त घातली आहे.
. अजुन किती दिवस आता आपण हे सहण करणार . हे लक्षात घेवुन सरकारने लसीकरण अनिवार्य केले आहे . परंतु अद्याप आपल्या गावामध्ये लसिकरणाची भणक सुध्दा लागली नाही . बोटाच्या कांड्यावर मोजण्या इतक्याच लोकांचे गावामध्ये लसिकरन झाले आहे . आजुबाजुच्या गावामध्ये अतिशय प्रखरतेने लसिकरनासाठी हालचाली चालु
असुन त्यांनी गावामध्ये लसीकरण केंद्र सुरु करुण गावातच लस पुरवली आहे . असे आपण ऐकलेच असेल आणी हो ते सत्यच आहे .
यावर दखल घेवुन आपल्या सोयंदेव ग्रामप्रशासनाने यावर लवकरात लवकर पाऊले उचलावी नाही तर आपणच आपली माणंस गमावुन बसु . गावामध्ये लसीकरण केंद्र आणण्या मागचा ऐकच हेतु आहे . प्रत्येक व्यक्ती आपल्या गावातील सक्षम नाही . अपंग , वयवृध्द व्यक्तींना लस घेण्यासाठी जर आपण किंनगावराजा केंद्रावर नेले तर तिथे रांगाच रांगा आपल्याला बघायला मिळतात . गावात जर लस ग्रामप्रशासनाने जर आणली तर गावाचा पैसा वाचेल , वेळ वाचेल , आणी सर्वात म्हत्वाचे म्हणजे आरोग्य स्थिर राहील. कोरोनाच्या काळात आम्ही ग्रामप्रशासनाच सोबतच आहोत .
आपलाच
सज्जन जी शेळके