सोमवारपासुन भद्रावती तालुक्यातील दुकाने सात वाजेपासुन दुपारी दोन वाजेपर्यंत पर्यत सुरु राहील व्यापारी संघटनेत तसेच छोट्या मोठ्या दुकानदारांमध्ये आनंदाचे वातावरण
भद्रावती ग्रामीण प्रतिनिधी
मंगेश भोयर_7387980876
भद्रावती : गेल्या तीन महिन्यापासून कोव्हीड_19च्या महामारी मुळे सर्व क्षेत्रातील मजुर चालक _मालक व्यापारी छोटे मोठे दुकानदार हात ठेले व कामगारांना वेठीस धरुन जीवन म्हणून जगने खुप महागात पडले व्यापारासाठी लंपंडाव चालु होता कधी दोन तास तर कधी तीन तास तर कधी चार तास दर पंधरा दिवसांनी शासनाच्या आदेशानुसार नियमावली जाहीर व्हायची.दुकानाच्या वेळा मात्र सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच असल्यामुळे सर्व जनजिवन विस्कळीत झाले असे म्हणायला हरकत नाही मात्र काल जिल्हाधिकारी मा.अजय गुल्हाने चंद्रपूर यांनी काल दिलेल्या आदेश्यानुसार येत्या सात तारखेपासुन रोज सोमवारपासुन सर्व दुकाने कडक निर्बंधासह शीथील सकाळी सात वाजेपासुन तर दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहन्याचे आदेश चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्याकडुन भद्रावती नगर प्रशासनाला देन्यात आले. त्यामुळेच भद्रावती तालुक्यातील सर्व व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरन दिसुन येत आहे.*