आटोचालक वाजंत्री सलून कामगारांना किराणा किटचे वाटप
आमदार किर्तीकुमार भांगडियां यांनी दिला मदतीचा हात
प्रतिनिधी_प्रविण वाघे नेरी 7038115037
। कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत लोकडाऊन मुळे आटोचालक वाजंत्री व सलून व्यवसायिकांना कुटुंब चालविण्याकरिता संघर्ष करावा लागत आहे तेव्हा आमदार किर्तीकुमार भांगडीया याना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा हात पुढे करीत किराणा किट चे वितरण केले
कोरोनाच्या संकट काळात रोजगारापासून वंचित झालेल्या नेरी शिरपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील आटोचालक बॅंड पथक कामगार सलून व्यवसायिक याना आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या कडून किराणा किट चे वाटप करण्यात आले यावेळी वाटप करताना मा श्री राजुपाटील झाडे तालुका अध्यक्ष भाजपा चिमूर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये किराणा किटचे वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रामुख्याने रामेशजी कंचरलावार जेष्ठ नेते भाजपा दत्तूजी पिसे सौ मायाबाई ननावरे महिला तालुका अध्यक्ष भाजपा संदिपभाऊ पिसे जी प प्रमुख पिंटू खाटीक हर्षल कामडी व इतर सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
