प्राथमिक आरोग्य केंद्र बाळापुर येथे आ. बंटी भांगडीया यांच्या हस्ते अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
प्रतिनीधी_प्रविण वाघे -मो, 7038115037
ग्रामीण आरोग्य यंत्रणेमध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिकेची गरज बघता व ग्रामीण आरोग्य यंत्रणेला पाठबळ मिळण्याकरिता आज दि. 5 जून रोजी आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या पाठपुराव्याने चिमूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गम क्षेत्र बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला १ अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रदान केली.
लोकार्पण प्रसंगी सर्वश्री भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजुकर, जि.प. सदस्य संजयजी गजपुरे, भाजपा जिल्हा सचिव राजूभाऊ देवतळे, भाजपा नागभीड तालुका अध्यक्ष संतोषभाऊ रडके, कृ.उ.बा. समिती नागभीड चे सभापती आवेश पठाण, न.प. नागभीड चे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर , न.प. नागभीड चे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, नगरसेवक शिरीष वानखेडे, नगरसेवक रुपेश गायकवाड, डॉ मदन अवगडे, धनराज बावनकर, भोजराज नवघडे, प्रशांत कामडी, विलास मोहूर्ले, आनंद भरडकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी आदी उपस्थित होते.
