पेठ ग्रामपंचायत च्या पुढाकाराने ग्राम स्वछता अभियान जोमात
विशाल गवई तालुका प्रतिनिधी
चिखली 7083304124
दि.०७ जून २०२१ रोजी गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ग्रामपंचायत पेठ येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारांची जाणीव ठेवून सरपंच विष्णुपंत शेळके , ग्रामसेवक समाधान पडघान , विदर्भ दूत जिल्हा प्रतिनिधी मनोज जाधव , उपसरपंच भगवान गायकवाड , ग्रामपंचायत सदस्य कडुबा टेंगसे ज्ञानेश्वर शेळके, ग्रामपंचायत चे कर्मचारी विठ्ठल शेळके , राजेंद्र पांढरे यादव मामा या सर्वांनी स्वतः हजर राहून गावातील नाल्या साफ करून घेतल्या.
गावातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले कसे राहील यावर चर्चा करण्यात आली आणि लवकरात लवकर नवीन नाली बांधकाम करून गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम रावण्याचा निर्धार केला.

