नऊ वर्षाच्या मुलीला शिक्षक मैत्रिणीने दिली उठाबठकीची शिक्षा मुलीची प्रकृती खालावली
उमरेड तालुका प्रतिनिधी
मनोज चाचरकर 9970643453
उमरेड/भिवापुर,नव वर्षाच्या मुलीला शिकवणी वर्गात उशीर झाल्याने चक्क का उठाबश्या मारण्याची शिक्षा शिक्षण क्षेत्रातील शिक्षक मैत्रिणीने दिली. परिणामी त्या विद्यार्थिनीची प्रकृती अस्वस्थ झाली.
सदर घटना भिवापूर तालुक्यातील *महालगाव* येथे नुकतीच उघडकीस आली. आचल कोकाटे शिक्षा ठोठावलेल्या मुलीचे नाव आहे. यासंदर्भात संतप्त पालकांनी सदर शिक्षक मैत्रीण विरुद्ध बेला पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे.
"मुले म्हणजे देवाघरची फुले" असे आपण मुलांना तळ हाता परी जपतो व त्यांची काळजी घेतो. कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. शालेय विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याला नाईलाज म्हणून मोबाईल ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू करण्याचा शिक्षण पद्धतीने सांगण्यात आले, अर्थातच ग्रामीण भागामध्ये नेटवर्क नसल्याने या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना लाभ घेणे अशक्य होत होते, म्हणून ऑनलाइन शिक्षण ग्रामीण भागामध्ये करतानी अळचन दिसून येते. यावर उपाय म्हणून, महालगाव येथील शिक्षक व ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन सात शिक्षक मित्रांची नियुक्ती केली आणि त्यांना दोन हजार रुपये मानधन देण्याचे ठरविले. हे सगळे शिक्षक मित्र आपापल्या घरी शिकवणी वर्ग घ्यायचे गटशिक्षण अधिकारी यांना दिलेल्या माहितीनुसार वर्ग 4 ची जबाबदारी अचल कोकाटे या शिक्षक मैत्रिणीवर होती. घटनेच्या दिवशी *गाथा कपील मुल* नामक इत्यादी चौथी विद्यार्थिनी कोकाटे यांच्या घरी शिकवणीसाठी गेली तिला काही कारणास्तव उशीर झाल्याने आचल कोकाटे या शिक्षक मैत्रिणीने तिला उठाबशा मारावयास सांगितले,अशी माहिती गावातील काही लोकांनी दिली. गाथा हिची प्रकृती अस्वस्थ झाली व तिला उपचारासाठी डॉक्टर कडे न्यावे लागले. डॉक्टरांनी तपासून गाथाला मेंदू संबंधी आजार जळल्या चे सांगितले सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती अद्याप अव्यवस्थीथ असल्याने तिचे काका पंकज मुल या प्रकरणाचे संपत माहिती आचल कोकाटे यांच्याविरोधात बेला पोलीस स्टेशन ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघमोडे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की याप्रकरणी आचल कोकटे यांच्यासह राजेश चौधरी व पांडुरंग बुचे या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू असल्याचे वाघोडे यांनी सांगितले.
