चिमुर तालुक्यातील मोटेगाव येथे कोविड19च्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
54 लाभार्थ्यांनी घेतली लस
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:-प्रवीण वाघे,
मो, 7038115037
संपूर्ण देशात आणि जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना रोगाला प्रतिकार करण्यासाठी शासनाने रोग प्रतिकारक लस शोधून काढली असून सर्वत्र लसीकरण बदल जागृती आणि लसीकरण मोहिमेला सुरवात केली आहे आज मोटेगाव येथील जी प शाळेमध्ये या लसीकरण मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले यात 18 वर्षावरील आणि 45 वर्षावरील वयोगटा महिला पुरुषांना लसीकरण करण्यात आले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि आता तिसरी लाट उबरट्यावर येणार असल्यामुळे लसीकरण मोहिमेला सरकार ने गती देत गावा गावात फिरते लसीकरण केंद्र तयार करून नागरिकांना लस उपलब्ध सरकार करीत आहे आज या मोहिमेचे उदघाटन सरपंच सुभाष नेवारे उपसरपंच चंद्रभान रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लसीकरण मोहीम आरोग्य अधिकारी बनकर मॅडम आणि टीम यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली यात 54 लाभार्थ्यांनी लसीकरनाचा लाभ घेतला यावेळी आरोग्य सेवक निखाडे आशाताई वर्षा सुकारे किरण खोब्रागडे नेवारे तेजराम इंगुलकर ग्रा प सर्व सदस्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते