वार्ड क्रमांक 23 मध्ये लहान मुलांना लसीकरणाला सुरुवात

वार्ड क्रमांक 23 मध्ये लहान मुलांना लसीकरणाला सुरुवात


उमरेड तालुका प्रतिनिधी

मनोज चाचरकर 9970643453



उमरेड,गेल्या काही वर्षापासून वार्ड क्रमांक 23 मधील समप्त नागरिकांनी जसे चिचघरे लेआउट, दुर्गा नगरी, बहिणाबाई नगर, डहाके ले आऊट. इत्यादी नागरिकांची लहान मुलांना लसीकरण यासाठी मागणी होती. या प्रभागाती नागरिकांना प्रचंड त्रास सहन करून बरच लांब ग्रामीण रुग्णालय मध्ये जावे लागत होते. तसेच काही लोकांना साई मंदिर परसोडी येथे लहान बालकांना लस दिली जात होती. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्यामुळे येथील नागरिकांनी आमच्या  वॉर्डांमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात यावी ही मागणी वारंवार ग्रामीण रुग्णालय मध्ये केली. त्याच प्रित्यर्थ आज दिनांक 23 जुलै ला जनतेच्या मागणीप्रमाणे "हनुमान मंदिर" चिचघरे ले आऊट,परसोडी येथे लहानबाळांचा लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामध्ये मांडवकर सिस्टर, मेश्रम आशा वर्कर यांनी लसीकरणाचे कॅम्प आयोजित करून लहान मुलांना लसी दिली, व हे कॅम्प महिन्याच्या चौथ्या गुरुवारी नियमित होईल असे सर्व नागरिकांना सांगण्यात आले. व लाभार्थीनी आयोजीताचे आभार वेक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler