शुटिंगबॉल फेडरेशन आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.शेळके यांची निवड

 शुटिंगबॉल फेडरेशन आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.शेळके यांची निवड 

कोषाध्यक्षपदी शकील काझी 

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे

देऊळगावराजा:    शुटिंग बॉल फेडरेशन आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी  श्री बालाजी महाराजांच्या पुण्य नगरीतील फुले,शाहु,आंबेडकर, आझाद विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी मुळे शुटिंगबॉल खेळाडू तसेच युवकांमध्ये नविन चैतन्य निर्माण झालेला आहे. कोषाध्यक्ष पदी शकील काझी यांची निवड करण्यात आली या दोन्ही निवडी बद्दल बुलडाणा जिल्ह्यात त्यांच्या निवडी बद्दल जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

         शुटिंग बॉल फेडरेश्न आॅफ इंडिया ने स्पोर्ट कोड २०११ अंगीकारल्यामुळे एक राज्य एक संघटना हा नियम लागू झाला. त्यानुसार महाराष्ट्रातील विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र साठी शुटिंगबॉल असलेल्या दोन्ही संघटना एकत्र होऊन नविन संघटना स्थापन करण्यासाठी शुटिंग बॉल फेडरेश्न आॅफ इंडियाचे महासचिव रविंद्र तोमर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव जि.नाशिक येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आली होती. त्या सभेत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शुटिंग बॉल फेडरेश्न आॅफ इंडियाची नविन कार्याकारणी सर्वानुमते घोषीत करण्यात आली. मागील २०१७ मध्ये विदर्भ शुटिंगबॉल असोसिएशनच्या विदर्भ अध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांनी ३ वर्षात शुटिंगबॉल मध्ये अनेक खेळाडू तयार केले अनेक स्पर्धा आयोजीत करुन विदर्भाचा नाव महाराष्ट्रात चमकविला त्यांच्या धारदार शैली आणि नविन काम करण्याची उर्जा पाहून  शुटिंगबॉल असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी  श्री बालाजी महाराजांच्या पुण्य नगरीतील फुले,शाहु,आंबेडकर, आझाद विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कोषाध्यक्ष पदी शकील काझी यांची निवड करण्यात आली आहे.

     नवीन शूटिंग बॉल संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे असेल. 

 राजेन्द्र येड्रावकर (आरोग्य राज्यमंत्री), डॉ राजेंद्र एकनाथराव विखे पाटील (अध्यक्ष, प्रवरा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस , लोणी), आमदार  सुहासआण्णा कान्दे ( नांदगाव विधानसभा मतदारसंघ ) आदींना संरक्षक म्हणून तर अध्यक्ष मनोहर साळवी, कार्याध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, उपाध्यक्ष  मनीष आनंद, उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके, उपाध्यक्ष जयवंतदादा भोसले

उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, सचिव  विष्णू निकम, सहसचिव सुहास गावंडे, सहसचिव तुकाराम रामनबैनवाड, खजिनदार शकील काझी, तांत्रिक समिती प्रमुख सदाशिव माने, सदस्य त्र्यंबक राजे, सदस्य चंद्रशेखर कन्हेरकर, 

सदस्य साजीद अन्सारी, आदींना कार्यकारिणी मध्ये समाविष्ट करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler