बुलडाणा जिल्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात अतिर्वूष्टींचा पाऊस.
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा
समाधान बंगाळे 93565 67231
साखरखेर्ङा परिसरातअतिर्वूष्टीचा पाऊस बुलडाणा जिल्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील भोगावती नदीला ता.15जुलै रोजी 3:30वाजता महापुर आल्यामुळे अनेक शेतकरी,प्रवासी अडकल्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.तब्बल तिसय्रा दिवशी मुसळदार पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.अनेक जमिनी खरडून गेल्या आहेत.या महापुरामुळे साखरखेर्डा पुलावरील लोखंडी रपेटे वाहून गेले आहे व कोराडी प्रकल्पाला धोका निर्माण झाला होता.धुव्वादार पावसाने भोगावती कोराडी नदीला महापुर आल्याने रताळीचा पाझर तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती.लव्हाळा साखरखेर्डा ते शिंदी मेरा आणि रताळी व दुसरबिड सिंदखेडराजाला जोडणाय्रा मार्गावरील दोन तास वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता.हा महापुर पाहण्यासाठी साखरखेर्डा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व प्रशासनाने ताक्ताळ नुकसानग्रस्त शेतकय्रांच्या शेतातील महसुल विभागाला पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे व भरीव आर्थिक मदत मिळावी अशी साखरखेर्ङा परिसारातील शेककरी वर्गाची मागणी आहे.
