धक्कादायक:- घुग्घुस येथील २७ वर्षिय तरुण युवकाची आपल्याच दुकानात गळफास घेऊन आत्महत्या
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रविन वाघे मो, 7038115037
घुग्घुस :- शहरातील तुकडोजी नगर वार्ड क्रमांक ६ मध्ये राहणारे २७ वर्षिय संतोष तुळशीदास चुने यांनी आपल्या दुकामध्ये पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड़किस आली.
रोज प्रमाणे संतोष हा सकाळी साडे_सहा वाजता च्या दरम्यान घराबाहेर गेला व चौकात चहा नाश्ता करुन त्याने घुग्घुस-चंद्रपुर मार्गावर असलेली लेडीज़ जनरल स्टोर्स दुकान उघडली मात्र दुकानातच शटर अर्धवट बंद करुन आतल्या पंख्याला गळफास लाऊन आत्महत्या केली.
आत्महत्येचं नेमक कारण काय हे अजूनही स्पष्ट कडू शकले नाही, मृतक संतोष यांच्या शेजारी पोलिसांना सुसाइड नोट मिळालेले असून त्यामध्ये आत्महत्येसंबंधी कारणाचा काही उल्लेख आहे काय याचा तपास घुग्घुस पोलिस करीत आहे, प्रेत उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपुर सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले,
