मुसळदार पावसामुळे शिंदी येथील धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकय्रांच्या पोटाची भाकर गेली वाहून.
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा
समाधान बंगाळे 93565 67231
ता.15जुलेच्या दुपारच्या सुमारास सलग दोन तास मुसळदार पावसाने शिंदी येथे जोरदार हजेरी लावली.मागील महीण्यात ढग फुटींचा पाऊस झाला होता त्या पावसामुळे सुद्धा शेतकय्रांचे अतोनात नुकसान झाले होते व आताच्या मुसळदार पावसाने नितीन खरात,आकाश खरात,अशोक खरात,सुरेश खरात,श्रीधर खरात सुद्धा शेतकय्रांच्या जवळपास 200 हेक्टर शेतजमिनी खरडुन व अगदी जलमय झाल्यामुळे सोयाबिनच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे.या पावसामुळे शिंदी येथील धरण 100 टक्केभरून ओव्हरफ्लो झाले आहे व नदी नाल्या सुद्धा तुटुंब भरून वाहत आहे. शिंदी नगरीअगदी परिसर जलमय झाली आहे.गावातील उत्तम अंभोरे, रमेश तोडे,सुगदेव खटके,रमेश गिरी,वर्षा दळवी,सुदाम साबळे,संदीप वैद्य या गरीबांच्या घरात पाणी घुसुन अन्नधान्य,वस्ञ,भांडे,आणि किरकोळ पैसे, मुलांची शालेय साहीत्य यांची मोठ्या प्रमाणात नासाडी होवून पुर्णपणे वाहून गेले आहे.गावात पाणी शिरल्यामुळे अनेक गोरगरीबांना उघड्यावरच रहावे लागत आहे अशी वास्तव परिस्थिती शिंदी नगरी मध्ये निर्माण झाली आहे.या महाप्रलयामुळे शेतकय्रांचे आणि गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे.या मुसळदार पावसाचा सामना दोन्ही वर्गाला करावा लागत आहे.अजुनही शेतकरी आणि मजुर वर्ग पावसामुळे शेतात अडकले आहे.शेतकय्रांच्या आणि गावातील नागरिकांच्या पोटाची भाकर वाहून गेल्यामुळे अश्रु अनावर झाले आहे व उपासमारीची वेळ आली आहे व र्मूत्युशिवाय पर्यायचं उरला नाही अशा भावना व्यक्त केल्या आहे.प्रशासनाने ताक्ताळ या प्रकरणाची दखल घेवून महसुल विभाग यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात यावे व भरीव आर्थिक स्वरूपात मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी आणि गोरगरीब नागरिक करीत आहे.