शेगाव बु येथे वरोरा-चिमूर महामार्ग मेन रोडवर वारंवार ट्राफिक जाम होत असते...
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर 8308264808
शेगाव बु येथे रोडवरील बसस्टॅन्ड वर वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे नेहमीच ट्रॅफिक जाम होत असते. दोनही बाजूला रस्तावर चिखल तथा खालन भाग असल्यामुळे नेहमी जाम होत असतो. एस आर के कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तथा ट्राफिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सोमवरला नेहमीच जाम होत असतो. सोमवार हा नेहमीचा बाजाराचा दिवस असल्याने त्यांनी योग्य नियोजन केले तर हा जाम होणार नाही असे गावातील व बाहेर गावातील नागरिकांचे मत आहे.

