लोढोंली ग्रामपंचायत आरक्षित जागेवर कांग्रेस चे नवनिर्वाचित सरपंच श्री उष्टुजी पेदोंर यांची बिनविरोध निवड
सावली तालुका प्रतीनीधी
उमेश गोलेपल्लीवार मो.9623494935
सावली-तालुक्यातील नुकताच झालेल्या सरपंच च्या आरक्षण अभावी रिक्त असलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणात नव्याने बदल करून नवनिर्वाचित सरपंच घेण्यात आले विजय भाऊ वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय लोढोंली ग्रामपंचायत चे माजी सरपंच दिलीप भाऊ लटारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक जिंकली परंतु लोंढोली ग्रामपंचायत मध्ये सरपंच अनुसूचित जाती महीला राखीव आल्यामुळे उमेदवार नसल्याने जागा रिक्त होते.नविन आरक्षण सोडण्यात आले त्यात अनुसूचित जमाती पुरुष असे बदल झाले व सरपंच पदी श्री उष्टुजी पेदोंर यांची नवनिर्वाचित सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यावेळी लोढोली ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रमोद खोबे.राजीव बोदलकार शालीनी खोबे गिता मडावी शिल्पा भांडेकर निकीता गेडाम परीमल भटकर भारती ठाकूर व माजी सरपंच दिलीप भाऊ लटारे यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचे हार्दिक अभिनंदन केले.
