नत्थूजी श्रीहरी भोयर सर ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानित गुरुकुंज आश्रम मोझरी येथे पदवी ने सम्मानित
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रविन वाघे 7038115037
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी जि अमरावती च्या वतीने ग्रामगीता जीवन विकास परीक्षा घेण्यात येते या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्याना ग्रामगीताचार्य या सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात येते ही परीक्षा देण्यासाठी व राष्ट्रसंताच्या जीवन प्रणालीवर अनेक परीक्षा द्यावे लागतात तसेच राष्ट्रसंताच्या विचाराचे तत्वांची तत्वज्ञाची प्रसार व प्रचार करण्याची पात्रता असणाऱ्या व्यक्तीला ही पदवी प्रदान करण्यात येते श्री नत्थुजी भोयर सर यानी वंदनीय महाराजांच्या तत्वप्रणाली वर विश्वास ठेवून त्यांच्या कार्याची माहिती घेऊन ही परीक्षा उत्कृष्ठ पने उत्तीर्ण करून ग्रामगीताचार्य या पदवीने सन्मानित झाले
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामडळ गुरुकुंज आश्रम मोझरी येथे श्री राष्ट्रसंताच्या महासमाधी समक्ष श्री नत्थुजी भोयर सरांना ग्रामगीताचार्य या पदवी ने सन्मानित करण्यात आले यावेळी सन्मानित करताना हभप सर्वाधिकारी प्रकाश वाघ महाराज परीक्षा विभाग प्रमुख निमजे सर अध्यक्ष गुलाबराव गवसे महाराज सरचिटणीस जनार्धन बोथे सचिव गोपाल कडू गुरुकुंज आश्रम आणि अनेक गुरुदेव पदाधिकारी गुरुदेव भक्त यांच्या उपस्थितीत पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले
