एअरबोर्ण ट्रेनिग सेंटर व मार्शल आर्ट ट्रेनींग तर्फे कारगिल विजय दिन साजरा
तालुका प्रतिनिधी वरोरा
गणेश उराडे 8928860058
वरोरा :- आज दिनांक 26 जुलै 2021 कारगिल दिवसा निमित्त वरोरा शहरात एअरबोर्न ट्रैनिंग सेंटर व मार्शल आर्ट ट्रैनिंग सेंटर तर्फे सोशल डिस्टन्स पाडून कारगिल दिवस पाळण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन एक्स. आर्मी संदीपसर कोहळे, एक्स आर्मी रवींद्रसर तुराणकर, एक्स बिएसफ प्रवीणसर चिमुरकर, मार्शल आर्ट रवीभाऊ चरुरकर यांनी केले. त्यावेळी सोशल डिस्टन्स पाळून जय हिंद, जय भारत, भारत माता कि जय, अमर अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे असे नारे लावत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात रॅली काढण्यात आली. तसेच शहीद योगेश डाहुले स्मारकला कारगिल दिवसा निमित्त आदरांजली देण्यात आली. एअरबोर्न ट्रैनिंग सेंटर व मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर वरोरा यांच्या माध्यमातून माजी सैनिकांनाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आमदार प्रतिभाई धानोरकर, माजी आमदार मोरेश्वरजी टेमुर्डे, विदर्भ नेते रमेशजी राजूरकर, शिवसेना तालुका प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलासभाऊ नेरकर, नगरसेवक छोटुभाऊ शेख होते. यावेळी मान्यवरांनी NCC विद्यार्थाचा ट्रॉफी देऊन सत्कार केला. माजी सैनिकांनी मार्शल आर्ट ट्रैनिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांना आर्मी भरती, पोलीस भरती फिटनेस, कराटे बद्दल मार्गदर्शन केले. आपल्या देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील युवापीढिना सीमेवर लढण्यासाठी प्रत्येक घरी सैनिक तयार करेल असे व्यक्तव एअरबोर्न ट्रैनिंग सेन्टर व मार्शल आर्ट ट्रैनिंग सेंटर वरोरा चे एक्स आर्मी सागरसर कोहळे, एक्स आर्मी रवींद्र सर तुराणकर, एक्स बिएसफ प्रवीणसर चिमुरकर, मार्शल आर्ट रवीभाऊ चरूरकर यांनी केले.
