ब्रेकिंग न्यूज-अखेर बिबट पिंजऱ्यात सापडला
सावली तालुका प्रतीनीधी
उमेश गोलेपल्लीवार मो.9623494935
सावली-वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवनक्षेत्रातील व्याहाड बुज सामदा वाघोली परिसरात काही दिवसांपासून बिबट चांगलाच धुमाकूळ घातला होता व्याहाड बुज येथील गंगुबाई रामदास गेडाम हिला बाहेर काढून ठार केले होते.त्यामुळे बिबट जेरबंद करण्यासाठी वनविभाग यांनी 6 पिंजरे लावले होते मात्र आज सायंकाळी आखीर बिबट पिंजऱ्यात सापडला .बिबट सापडला अशी माहिती मिळताच परीसरातील लोकांनी गर्दी केली मात्र वनविभागाचे कर्मचारी उपस्थित असल्यामुळे वनविभाग अधिकारी वसंत कामडी वनपाल बुरांडे साहेब या परीस्थिती वर नजर ठेवून होते.वनविभाग अधिकारी यांचे गावातील लोकांनी आभार मानले.