ब्रेकिंग अवैध कोळसा वाहतूक करणारे ट्रक खांबाडा गावातील गावकऱ्यांनी अडविले
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- गेल्या 15 दिवसपासून खांबाडा ते नागरी रोड वर अवद्य कोळसा वाहतूक चालू आहे चड्डा ट्रासस्पोर्ट चे ट्रक आहे या ट्रान्सपोर्ट कडे कसलाही परवाना नसताना गेल्या 15 दिवसापासून अवैध वाहतूक सुरू आहे 15 दिवसाच्या आधी गावकऱ्यांनी ट्रक अडवले होते मधात काही दिवस 10 दिवस वाहतूक बंद झाली होती परंतु पुन्हा बळजबरीने अवैध वाहतूक सुरू झाली खांबाडा ते नागरी रोडवर या अवैध वाहतुकी मुळे रोड खराब होऊन मोठमोठाले खड्डे पडुन आजपर्यत या रोड वर कितीतरी लोकांना आपला जीव गमवावा लागला रोड वरील मोठं मोठे खड्डे पडल्याने या रोड नी अपघात होत आहे प्रशासनानि लवकरात लवकर या रोड चे काम चालू करावे आणि कोळशाची होणारी अवैध वाहतूक थांबवावी अन्यथा होणाऱ्या आंदोलनास प्रशासन जाबाबदार असतील असे राजुभाऊ देठे, रमेश वाटमोडे, नितीन लडके, अंबर खानेकर, प्रकाश देठे, नितीन वाटमोडे, भोंगारे, पंढरी भोयर, दिनेश धोटे, भोला शिडाम, नत्थुजी वाघाडे, गणेश मडावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली पोलीस प्रशासनाच्या मध्यस्तीने हे ट्रक हलविण्यात आले लवकर उचित कार्यवाही करू असे अस्वासन पोलिस प्रशानाने दिले

