शेगांव (बु.) परिसरात तात्काळ फवारणी करावी....प्रहारची मागणी.....
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकरमो.न.8308264808
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीची साथ सुरु आहे ते आता शासनाच्या प्रयत्नामुळे आटोक्यात येत आहे. हा साथीचा रोग संपत नाही तो शेगाव परिसरासह जिल्ह्यात डेंग्यूची रोगराई पसरत असल्याने लहान मुलासोबत मोठे व्यक्तीही ग्रासून राहिलेले आहे. त्यांना आळा घालण्यासाठी लवकरात लवकर विविध प्रकारची औषधीची फवारणी करावी जेणेकरून साथीच्या रोगाला आळा बसेल व नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने अक्षय बोदगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहारसेवक अमोल दातारकर, आकाश नाकाडे, संदीप चौधरी, धीरज झाडे व अक्षय दातरकर उपस्थित होते.

