ग्रा.पं. सदस्याच्या पतीची दादागिरी महिलांना केली शिवीगाळ, पो. स्टे. ला तक्रार दाखल वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील घटना,

ग्रा.पं. सदस्याच्या पतीची दादागिरी महिलांना केली शिवीगाळ, पो. स्टे. ला तक्रार दाखल वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील घटना, 


वरोरा तालुका-ग्रामीण प्रतिनिधी 

 गणेश ऊराडे मो, ८९२८८६००५८



वरोरा :- ( बोर्डा ) - सध्या सर्वत्र शेतीचा हंगाम सुरू असल्याने खेडेगावातील शेतकरी शेतमजूर,  महिला शेतमजुरीच्या कामाला जातात.बोर्डा गावातील वॉर्ड क्र.2 मधील काही महिला शेतकरी पुनवटकर यांच्या शेतात कामाला जातात .त्यात शारदा येटे,अनिता कोडापे,मीना अंबादे,सुनंदा सोयम,शांताबाई सोयाम या महिला कामाला जात असतांना काल सायंकाळी वाहन चालकाने महिलांना कामावरून परत घरी सोडले. कॅटरचे  काम करणाऱ्या अनिल इंगळे याने वाहन  चालकसोबत वाद घातला व   चिडून सदर  वाहन चालकाला शिवीगाळ  केली.तसेच शेतमजुरीच्या कामाला जाणाऱ्या महिलांना अश्लील शिवीगाळ केली याबाबत जाब विचारायला गेलेल्या  शेवंता जांभूळे व शारदा उमेश येटे या महिलेला अनिल इंगळे याने अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली,  सर्व महिला  मिळून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्या असता पोलीस स्टेशन वरोरा येथे सदर   तक्रारीची दखल   घेत तक्रार दाखल करण्यात आली .सदर  कारवाई वर समाधानी नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पीडित शेवंता जांभूळे व शारदा उमेश येटे या  दोन्ही महिलांनी सांगितले.ग्राम पंचायत समिती सदस्याच्या पतीवर पोलीस काय कारवाही करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler