तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय प्रशासनाचे दुर्लक्ष..

तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय प्रशासनाचे दुर्लक्ष..


सावली तालुका प्रतिनिधी

उमेश गोलेपल्लीवार मो.7218949428



सावली -तालुक्यातील हरांबा लोंढोली,जिबगाव, साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले आहे. या मार्गावरील मोठे खड्डे धोकादायक ठरत आहेत. यामुळे या मार्गावरून जाताना अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. सावली येथे बँका,शाळा, महाविद्यालये, सरकारी दवाखाना, बाजारपेठ अन्य शासकीय कार्यालये सावली येथे असल्याने हरांबा,उपरी,कापसी, जीबगाव,साखरी या गावातील लोकांची सावलीला दररोज ये-जा असते. तसेच रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनाची वळदळ सुरू राहते.सावली तालुक्याला जाणारा हा रस्ता गावांसाठी मुख्य मार्गावर असुन दुचाकी-चारचाकी या मार्गावर जास्त प्रमाणात  येत जात असतात. दुरुस्ती नाहीतर कमीत कमी खड्डे तरी भुजवावित ही मागणी वाहन चालक करत आहेत.तयार झालेल्या रस्त्याची दुरुस्ती तर दूरच पण साध्य खड्डे सुद्धा भुजवले जात नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य झाले असून रस्त्यांवर दुरवस्था झाली आहे.रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उघडले असून दोन ते तीन फुटाचे पसरट खड्डे पडले आहेत. मात्र या मार्गावर मोठे खड्डे पडले असून वाहन चालकास वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते रस्त्याची एवढी दुरवस्था झाली आहे तेव्हा प्रशासनाने नागरिकांची तालुका स्थळी येण्याकरिता होणारी फरपट थांबवावे अशी मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler