विस वर्षांपूर्वी वडील सरपंच त्याच ग्राम पंचायत मध्ये आता मुलीचा राज
सावली तालुका प्रतिनिधी
उमेश गोलेपल्लीवार मो.7218949428
सावली-जानेवारी महीन्यात निवडणूक पार पडली सावली तालुक्यातल्या वाघुली बुटी येथे 23 महीला रीनागणांत उभ्या होत्या अनुसूचित जमाती राखीव उमेदवार नसल्याने दुरुस्ती करून आरक्षण सोडण्यात आले यात अनुसूचित जाती महीला राखीव जागा असे आरक्षण सोडण्यात आले . आरक्षणानुसार सरपंचपदी 25 वर्षीय यमु होमनाथ मेश्राम हिची बिनविरोध निवड करण्यात आली .याच ग्रामपंचायत मध्ये 20 वर्षं वडील सरपंच होते.यमुताई मेश्राम ही उच्चशिक्षित सरपंच आहेत.20 वर्षांनंतर वाघुली बुटी या गावाला हुशार आणि उच्चशिक्षित सरपंच मिळाले आहे.आणी सर्वप्रथम गोरगरीब जनतेसाठी झटेन असी त्यांनी सांगितले व भविष्यात शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.
