अचानक काळाने केला घात आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा कष्टाच्या भाकरीला गेला होता मात्र पहिल्या दिवशीच म्रुत्यु,

अचानक काळाने केला घात आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा कष्टाच्या भाकरीला गेला होता मात्र पहिल्या दिवशीच म्रुत्यु, 



चंद्रपूर-जिल्हा प्रतिनिधी

प्रविन वाघे मो, 7038115037


मूल :- गोदामावर चढुन रंग मारत असतांना फायबर पत्रयावरून अचानक पाय घसरल्याने एका युवकांचा मृत्यु झाल्याची घटना येथील योग राईस मिल मध्यें घडली. येथील चामोर्शी मार्गावरील योग राईस मिल येथे रंग मारण्याचे काम सुरू होते. दुष्यत नामक कंत्राटदाराने रंग मारण्याचे काम करण्याची जबाबदारी स्विकारली होती. त्यानुसार कंत्राटदाराने रंग मारण्याचे कामावर काही युवकांना रोजंदारीवर ठेवले होते. विहिरगांव येथील रहीवाशी प्रितम दिनेश गेडाम वय (22) हा आजपासूनचं सदर कामावर गेला काम सुरू असतांना दुपारी 11.30 वाजताचे सुमारास प्रितम गेडाम हा राईस मिलच्या गोदामावर चढला. मात्र ते देवाला मान्य नव्हत, गोदामावर लावलेल्या प़ञ्यांना रंग मारत असतांना व्हेंटीलेंटरच्या फायबर पत्रयावर अचानक त्याचा पाय पडल्याने प्रितम पञ्यासह खाली फरशीवर पडला. उंचावरून खाली पडल्याने प्रितमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान राईस मिल मधील कामगार आणि त्याच्या सहका-यांनी जखमी प्रितमला उपचारा करीता उपजिल्हा रूग्णालयात हलविले. परंतु उपचारा पुर्वीच प्रितम मृत्यु पावल्याचे डाॅक्टरांनी सांगीतले. मृतक प्रितम हा आईवडीलांना एकुलता एक मलगा होता. बहिणीच्या लग्नानंतर आईवडीलांची जबाबदारी तो रोजंदारीवर काम करून सांभाळत होता. रंग मारण्याचे कामावर जाण्याचा आज मृतक प्रितमचा पहिलाच दिवस होता. मृतक प्रितमच्या कुटूंबाची हलाखीची परिस्थिती लक्षात घेवून योग राईस मिलच्या संचालकासह संबंधीत कंत्राटदाराने त्याच्या कुटूंबियास आर्थिक मदत देवुन माणुसकीचा प्रत्यय करून दिला. दरम्यान सदर प्रकरणाची मूल पो.स्टे.ला नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler