कोरोना काळात नेरी व परिसरात शेतकऱ्याची लूट ही लुटमार थांबनार तरी कधी शेतकर्यांचा प्रश्न
अवाजवी दराने खतांची विक्री युरिया खत हवे असेल तर इतर खते जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या माथी रासायनिक खतांची चिल्लर विक्री करून नफेखोरी करून लूटमार
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
नेरी:-खरीप हंगामाला जोमात सुरुवात झाली असून चांगल्या पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे ची पेरणी करून शेतीच्या हंगामाला वेग आणला आहे बियाणे जमिनीचे पांघरूण सारून वर आले आहे आता या पिकांच्या वाडीसाठी युरिया खताची व इतर रासायनिक खतांची आवश्यकता आहे परंतु कृषी केंद्राच्या नफेखोरी वृत्तीमुळे युरिया व इतर खतांचा साठा नसल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात ज्यादा दराने विक्री सुरू आहे. प्रशासनिक पातळीवर खताचा योग्य साठा असूनही नेरी व परिसरात कुत्रीम टंचाई निर्माण केल्या जात आहे.
सध्या शेतकऱ्यांचे कोरोनाने कंबरडे मोडलेले आहे. त्यातच कृषी केंद्राचालक हे अवाजवी दराने खतांची विक्री केल्या जात आहे. युरिया 300 ते 350 रु, तर 20.20.0.13 रु. 1500-2000 तर चिल्लर दारात युरिया 10 ते 15 रु कीलो व इतर खते 20-25 रु किलो दराने विक्री केल्या जात असतानाही मात्र प्रशासनातील अधिकारी हे मात्र कोणतेही कारवाई करीत नसल्याने अधिकाऱ्यांचे यात साटेलोटे असल्याचे शेतकऱ्यांचे बोलले जात आहे. अश्या अवाजवी दरावर खतांची विक्री करणाऱ्या या कृषी केंद्रावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत
नेरी व परिसर हा धान कापूस सोयाबीन पिकासाठी प्रसिद्ध आहे पिकांची लागवड होऊन पिके वर आली आहेत त्यांना आता वाढीसाठी युरिया नत्राची खूप आवश्यकता असते त्यामुळे शेतकरी कृषी केंद्रा कडे धाव घेत आहेत परंतु कृषिकेन्द्र चालक हे युरिया व इतर खतांचा साठा असूनही तुटवडा निर्माण करीत आहेत ज्या शेतकऱ्यांना युरिया हवे असेल त्याला जबरदस्ती दुसरे खते घ्यायला भाग पाडीत आहेत ज्यांनी कोणी फक्त युरिया पाहिजे म्हटले तर त्या शेतकऱ्यांना ठोक बॅग न देता चिल्लर 10 रुपये किलो प्रमाणे विक्री करून भरघोस नफा कमवीत आहेत कुणी युरिया मागायला गेला तर नाही आहे असे उत्तर मिळते गयावया करून मागितले तर या अटी शर्ती वर युरिया शेतकऱ्यांना दिला जातो वेळेवर युरिया खत मिळाले नाहीतर शेतकऱ्याच्या पिकांचे खूप मोठे नुकसान होते कृषी केंद्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक तसेच पिकांचे नुकसान होत आहे तेव्हा संबंधित विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी स्वतः किंवा बनावट शेतकरी पाठवून गुप्त पद्धतीने चौकशी करून कृषिकेन्द्र चालकांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.
यासंबंधात तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क केला असता सहारे पंचायत समिती चिमूर यांचेशी बोला असे सांगण्यात आले. मात्र अश्या आवजवी दराने खत विक्री करणाऱ्या कारवाई संदर्भात कोणतीही समाधान कारक उत्तर मीडालेले नाही.
