वरोरा चिमूर नॅशनल हायवेवरील इलेक्ट्रिक शिफ्टिंग कॉन्ट्रॅक्ट तात्काळ रद्द करावा प्रहार सेवक अक्षय बोदगुलवार यांची मागणी....
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भुतकर मो.न.8308264808
नॅशनल हाईवेवरील मागिल ४-५ वर्षापासून सुरू असलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३- ई रोडचे बांधकाम अतिशय हळूहळू सुरू आहे. रोडचे काम एस आर के कंपनीला मिळाले असून कामात खूप दिरंगाई करत आहे. रोडच्या आत येणारे इलेक्ट्रिकल पोल शिफ्टिंगचा कॉन्ट्रॅक्ट चंद्रपूर येथील अजित इलेक्ट्रिकल कंपनीला दिला आहे व इलेक्ट्रिक पोल शिफ्टींगचे काम अत्यंत सावकाश गतीने सुरू आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील पोल साईडला झुकले आहे व कधीही खाली पडू शकते. त्यामुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ शकते त्यामुळे वारंवार प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदन देऊन त्यांना समजून सांगितले तरी त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे आमची विनंती आहे की त्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट रद्द करावा व दुसऱ्या चांगल्या कंपनीला द्यावा हीच आमची मागणी आहे....
