वाघांची दहशत कायम पळसगांव जवळ वाघिनिच्या बछड्याचा हल्ला

वाघांची दहशत कायम पळसगांव जवळ वाघिनिच्या बछड्याचा हल्ला

एका वासराला केले ठार, नागरिकांमधे भीतीचे वातावरण

वनविभागाचा आंधळेपना


चंद्रपूर_जिल्हा प्रतिनीधी

प्रविण वाघे, 7038115037





चिमूर:- ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या चिमूर तालुक्यातील  पळसगाव परिसरात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून एका वाघिनिचा व तिच्या पासून दुरावलेल्या बछडयाचा धुमाकुळ सुरु आहे, गावातील दोन गोरह्याची त्यानी शिकार केली आहे, त्याना जंगलात पीटालून लावण्यासाठी वनविभागाचे पथक परिसरात गस्त घालत आहेत, मात्र बछडयापासुन दुरावलेली वाघिन त्याच परिसरात नऊ दिवसांपासून होती दरम्यान शुक्रवारी वाघीनीला तिचे बछड़े मिळाले तरीही वाघीन व बछडे त्याच परिसरात असल्याने गवक्रयाना धोका कायम आहे

        तत्तपूर्वी या वघिनिने दोघाना जखमिहि केले आहे, तय्यामुळे सम्पूर्ण पळसगांव आणि परिसरात परिसर दहशती खाली आला आहे, एवढेच नाही तर जंगल परिसरातील शेतकरयानी शेतावर जाने ही काही दिवस बंद केले होते, गोंडमोहाली येथील वासुदेव मसराम यांच्या शेतातील झुंड़पामध्ये भर दिवसा वाघाने ठान मांडल्याचे अनेकांना दिसले होते, 29 जुनला रामभाऊ चौधरी यांच्या शेतात वाघाचे पगमार्क दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, अश्यातच 30 जुनला वाघिनिचा बछडा पळसगावातील ताराचंद गुळधे यांच्या घरी सिरनार तेवढ्यात ताराचंद याना तो अंगनात दिसला, आरडाओरड केल्यानंतर बछड़ा पळन गेला, मात्र जाता जाता या बछड्यानी गोरयाची शिकार केली, दरम्यान गुरुवारी सिंदेवाहि-चिमूर रोडवरील भड़क पुलावर काम करणाऱ्या कामगाराना वाघिन आणि तिचे 3 बछडे वाघिनीसोबत असल्याचे सांगितले जात होते, यावरून वन विभाग गावकार्यना चूकीची माहिती देत असल्याचे निदर्शनास आले, या संदर्भात आमचे ctv प्रतिनिधि बालू सातपुते रविवारला पळसगांव येथे माहिती घेण्यकरिता गेले असता वनविभाग कार्यालामधे एकहि अधिकारी उपस्थित नव्हते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler