शिकवणी वर्गाच्या माध्यमातून करतो सामाजिक कार्य

शिकवणी वर्गाच्या माध्यमातून करतो  सामाजिक कार्य

नेरी येथील युवकाचे अभिनव उपक्रम


चिमुर तालुका ग्रामिन प्रतिनिधी

सचिन वाघे मो.9673757006



मागील दोन वर्षांपासून कोरोनाने कहर करून सर्व जनजीवन प्रभावित करून मानवाचे व्यवहार ठप्प केले यात शाळा महाविद्यालय शालेय विद्यार्थी सुद्धा सुटले नाहीत सर्व शाळांना टाळे लागून विद्यार्थी घरीच बसून आणलाईन शिक्षण घेत होते यात शासनाने दहावी ची आणलाईन व मागील गुणांकन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले परंतु आता अकरावी ला प्रवेश करण्यासाठी शासनाने सामाईक प्रवेश परीक्षा (CET)अनिवार्य केली आहे आणि  ही परीक्षा सर्वांना बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे एकदम नव्याने आलेली ही परीक्षा विद्यार्थ्यांना डोईजड ठरून अवघड ठरणार आहे त् तसेच या परीक्षेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अडचणींचा विषय ठरू लागलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेरी येथील आशिष गभने या  युवकाने पुढाकर घेत या परिसरतील विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गाच्या माध्यमातून समाज सेवेचा कार्य सुरू करून अभिनव उपक्रम राबवायला सुरवात केली आहे

        चिमूर तालुक्यातील आणि  नेरी परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आशिष हिरहिरीने शिकवणी वर्गाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहे आजचे युग हे स्पर्धा परीक्षेचे युग आहे त्यामुळे या युगात स्पर्धा करण्यासाठी पाल्य आपल्या पाल्याना नागपूर चंद्रपूर अश्या नामांकित शहरात परीक्षेची तयारी करण्यासाठी पाठवितात परंतु ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी याना आर्थिक परिस्थिती मुळे जाता येत नाही त्यामुळे आशीष गभने या सुशिक्षित बेरोजगार युवकाने अल्पशा मानधनात मोफत मार्गदर्शनाचे कार्य सुरू केले आहे यासाठी त्याने आपली छोटीशी सायन्स अकॅडमी शिकवणी वर्ग  नेरी व चिमुरात काडून ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन सुरू केले आहे 

       ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सीईटी परीक्षा बदल मार्गदर्शन मिळेनासे झाले होते तसेच ही परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण केल्यास विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविता येतो त्यामुळे या परीक्षेचे महत्व ओळखून ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून गेले पाहिजे यासाठी आशिष जिद्दीने कसून मार्गदशनाचे कार्य करीत आहे आणि या शिकवणी वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले आहे


प्रतिक्रिया -

ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणे शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळाव्यात याकरिता मी नेहमी प्रयत्नशीलअसतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यश हेच माझे अंतिम ध्येय आहे .. 

आशिष गभने

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler