तलावाचे अतिरिक्त पाण्याचा पाट बुजविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
नुकसानभरपाई ची शेतकऱ्याची मागणी
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
प्रतिनिधी नेरी।नेरी वरून जवळ असलेल्या बोथली काजळसर मार्गावर पटवाळू कांशीराम निकोडे यांची बोथली तलावाच्या मागे शेती आहे मागील सततच्या पावसामुळे या शेतामध्ये तलावाचे अतिरिक्त पाणी सारखा वाहुन जात आहे त्यामुळे शेतातील रोवणी केलेला 3 एकरवरील भात पीक सडून नष्ट होत आहे बांधानातील पाणी काहीही केले तरी निचरा होत नाही त्यामुळे संपूर्ण पीक उद्धवस्त होत आहे याला कारणीभूत रस्ता बनवणारी कंपनी सुद्धा जवाबदार आहे तेव्हा शासनाने किंवा रस्ता बनविणाऱ्या कंत्राटदाराने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेकतऱ्या सहित गावकरी करीत आहेत
सविस्तर वृत्त असे की पटवाळू निकोडे यांची शेती बोथली तलावाच्या मागे आणि काळजसर कडे जाणाऱ्या मार्गाला लागून आहे तलावाचे अतिरीक्त पाणी जाण्यासाठी निकोडे यांच्या शेताला लागून छोटा नाला (पाट) होता मागील 2 महिण्याअगोदर रस्ता बनविणाऱ्या कंत्राट कंपनीने रस्त्याच्या कामासाठी हा पाट बुजविला त्यांना याबद्दल अनेकदा पाट तयार करून द्या म्हणून सांगितले परंतु त्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्या दुर्लक्ष पणामुळे तलावाचे अतिरीक्त पाणी सतत निकोडे यांच्या शेतातून जात असल्यामुळे भात पीक सडून नष्ट होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट निर्माण झाले आहे आता काय करावे आणि पीक कसे वाचवावे या विवंचनेत शेतकरी पडला आहे भविष्यात काय करावे काय नाही कुटूंब कसे चालवावे असा बिकट प्रश्न समोर ठेपला आहे कंत्राट कंपनी आपले काम करून निघून गेले आहेत होणाऱ्या नुकसानीला जवाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा शासनाने होणाऱ्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शवंतकऱ्या सहित गावकरी करीत आहेत