मेंडकी ग्रामपंचायत कडुन लाभार्थाना औषधे वाटप
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि
मनोज अगळे 9765874115
ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी पंचायत समिती गणाचे सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या ५२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मेंडकी येथे १४ वा वित्त आयोग अनुदानातून मेंडकी ग्रामपंचायतच्या वतीने गावातील कमी वजनाचे बालक, तिव्र कुपोषीत बालक, गरोदर महिला, स्तनदा माता यांना प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दुर्वा यांचे मार्गदर्शने औषधांचे वाटप ब्रम्हपूरी पंचायत समिती सदस्य *थानेश्वर पाटील कायरकर* यांच्या हस्ते मेंडकी ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले.
या वेळी मेंडकी ग्रामपंचायत सरपंच सौ मंगलाताई इरपाते, ग्रामपंचायत सदस्य चिंताराम जेल्लेवार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबोरकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन गुरनुले, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती नयना गुरनुले, ग्रामपंचायत सदस्या सौ कुंदाताई कोरेवार, ग्रामपंचायत सदस्या सौ विद्या चौधरी, ग्रामपंचायत सदस्या सौ मोक्षाली शेंडे, ग्रामपंचायत सदस्या सौ जयश्री आंबोरकर, ग्रामपंचायत सदस्या सौ पुष्पा गभने, आरोग्य सहाय्यीका मंडल, अंगणवाडी सेविका,आशावर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी विनोद गुरनुले, अशोक मोहुर्ले, अशोक आंबोरकर,सुरज जांभुळकर, आदीसह बालकांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
