शहरातील रस्त्यांवर एस टी बस चालवताना चालक महिला औरंगाबाद.
अभिषेक जगताप (औरंगाबाद )
जिल्हा प्रतिनिधी 90756 28711
शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून दुचाकी चारचाकी वाहने चालवताना चांगलीच कसब लागते अशा रस्त्यांवर स्वतचं कौशल्य पणाला लावत महिला चालक एस टी चालवीत आहेत पण सध्या हा केवळ प्रशिक्षणाचा भाग आहे दोन स्टिअरिंग असणाऱ्या बसमधून हे प्रशिक्षण सुरू आहे औरंगाबाद आणि नाशिक विभागासाठी चालक पदासाठी 32 महिलांची निवड करण्यात आली आहे यात औरंगाबाद विभागातील 6 महिलांची निवड करण्यात आलेली आहे या महिलांना 100 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे त्यानंतर आता 200 दिवसांचे बस चालवण्याचे प्रशिक्षण सुरू आहे.एस. टी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक प्रशिक्षण अनंत पवार आणि 25 वर्ष एस टी चालवण्याचे अनुभव असलेले चालक एकनाथ गायकवाड हे सध्या महिलांना बस चालवण्याचे प्रशिक्षण देत आहेत.अवघ्या काही दिवसांतच महिलांचा स्टिअरिंग वर हात बसला आहे परंतु प्रशिक्षणादरम्यान महिलांची जिद्द आणि परिश्रम पाहता सर्व टप्पे पार पाडून त्या प्रवाशांना घेऊन बस चालवतील अशी आशा व्यक्त होत आहे विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्यासह एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन मिळत आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रशिक्षणार्थी चालक महिला पल्लवी बेलदार यांनी सांगितले की महिला विमान चालवतात रेल्वे चालवतात वाहतुकीची कोणतीही भीती वाटत नाही एस टी चालक होण्यासाठी कुटुंबियांनी पाठिंबा दिला आहे. आम्ही लवकरच आपल्या सेवेत रुजू होऊ.