चकपिरंजी येथील नळ योजना 22 दिवसांपासून बंद
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता उमेश गोलेपल्लीवार
मो.7218949428
सावली- सावली तालुक्यातील जीवन प्राधिकरण बोथली अंतर्गत येत असलेल्या चकपिरंजी येथील नळ योजना 22 दिवसांपासून बंद आहे. चकपिरंजी गावातील जनतेला नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.याकडे कोणत्याही अधिकारयाची लक्ष नाही आहे.ग्रामपंचायत चे पदाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.विषेश म्हणजे चकपिरंजी या गावात जिल्हा परिषद सदस्य आहेत.तरी पण नळ योजना 22 दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.तरी जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी याकडे विशेष लक्ष केंद्रित करून नळ योजना त्वरित सुरू करावी अशी मागणी चकपिरंजी गावातील जनतेनी केली आहे.