शेगाव (बु) येथील नवनियुक्त ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.अविनाश सी.मेश्राम यांनी गुरुवारला पदभार स्वीकारला.
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो,न,8308264808
शेगाव बु येथील पोलीस स्टेशन चे नवे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश सीताराम मेश्राम यांनी गुरुवारला पोलीस स्टेशनचे नवे ठाणेदार मनून पदभार स्वीकारला ठाणेदार अविनाश मेश्राम हे यापूर्वी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत होते. शेगाव (बु) पोलीस स्टेशनची हद्द मोठी असून १०८ गावांचा त्यात समावेश आहे त्यामुळे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्यासमोर परिसरातील हद्दीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता मोठे आव्हान असून याकडे स्थानिक गावातील तथा बाहेर गावातील नागरिकांचे लक्ष आहेत..
